वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील हनुमान कुस्तीगीर संघातर्फे रविवार दिनांक 19 मार्च रोजी दुपारी दोन वाजता भव्य कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. भारत विरुद्ध इराणच्या मल्लांची पहिल्या क्रमांकाची कुस्ती आयोजित करण्यात आली आहे. पैलवान अली इराण महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यास बेळगाव येथे हरवून बेळगाव मल्ल सम्राट किताब विजेता व आंतरराष्ट्रीय 125 किलो गटातील पैलवान तर पैलवान महेंद्र गायकवाड अर्जुनवीर काका पवार यांचा पठ्ठय़ा महेंद्र 605 नावाने गाजलेला सिकंदर शेख यास हरवलेला 125 किलो गट आंतरराष्ट्रीय सिल्वर मेडल विजेता आणि चालू वर्षाचा उप महाराष्ट्र केसरी विजेता. हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी उचगावमधील अनेक माजी पैलवान तसेच युवक, ग्रामस्थ, कुस्ती शौकीन सर्वजण कामाला लागले असून आखाडय़ाची पाहणी, दुरुस्ती करून भव्य असा आखाडा तयार करण्यामध्ये सर्व कार्यकर्ते गुंतले आहेत. उचगावच्या पूर्व दिशेला असलेल्या मरगाईदेवीच्या परीसरातील भव्य अशा तलावामध्ये हा कुस्ती आखाडा आयोजित केला आहे. सदर तलाव प्रचंड मोठा असल्याने कुस्ती शौकीनाना कुठेही बसून या कुस्तीचा आनंद लुटता येतो. य् ााबरोबरच लहान-मोठय़ा अशा एकूण जवळपास 50 कुस्त्या या आखाडय़ात होणार आहेत. या कुस्ती मैदान उद्घाटन समारंभाला सर्व थरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.