अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या
बेळगाव : येळ्ळूर येथे श्री कलमेश्वर, चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार दि. 28 एप्रिल रोजी लोकमान्य केसरी किताबासाठी भव्य कुस्त्या महाराष्ट्र मैदान येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज श्री मालोजीराव भोसले उपस्थित राहणार आहेत.
या मैदानात प्रमुख कुस्ती पंजाब केसरी प्रितपाल फगवाडा व हिंद केसरी, भारत केसरी भुपेंद अंजयाला यांच्यात लोकमान्य केसरीसाठी लढत होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी सोलापूर गंगावेस तालमीचा सिकंदर शेख व दिल्ली केसरी, हरियाणा केसरी दिल्लीचा रोहित चौधरी यांच्यात लढत होणार आहे. तिसऱया क्रमांकाची कुस्ती उत्तर भारत केसरी हरियाणाचा संतू गुज्जर व महान भारत केसरी गंगावेसचा माऊली जमदाडे यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील व हिमाचल चॅम्पियन संकमन अंजयाला यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगेरी व हिमाचल केसरी विकास खन्ना यांच्यात होणार आहे.
सहाव्या क्रमांकाची कुस्ती माऊली सूर्यवंशी, भोसले व्यायामशाळा व संगमेश बिराजदार मठपती आखाडा, सातव्या क्रमांकाची कुस्ती बंटीकुमार हरियाणा व प्रशांत शिंदे, भोसले व्यायामशाळा, आठव्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार वि. गुलफाम मुजावर यांच्यात, नवव्या क्रमांकाची कुस्ती आकाश येळ्ळूर वि. निलेश पवार सांगली, दहाव्या क्रमांकाची कुस्ती सौरभ पाटील राशिवडे वि. नाता पवार पुणे यांच्यात होणार असून याशिवाय 50 हून अधिक कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत.