प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला. प्रारंभी गणेश वंदन करण्यात आले. रोटे. रविंद्र यांनी स्वागत केले. इन्स्टालिंग ऑफीसर नासीर बोरसदवाला यांनी नूतन अध्यक्ष रवी हत्तरगी, सचिव अमित पाटील तसेच खजिनदार भरतेश पाटील तसेच त्यांच्या कार्यकारिणीला अधिकारसूत्रे प्रदान केली.
रवी हत्तरगी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. नासीर यांनी जनहितार्थ काम करणाऱया रोटरीला देणगी देणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करून सर्वांना रोटरी कुटुंबात येण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थितांनी रवी हत्तर्गी यांना शुभच्छा दिल्या.