जमीन घोटाळा प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
जमीन घोटाळा प्रकरणातील दोन आरोपींना म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. महम्मद सुहेल सफी व धिरेश नाईक अशी त्यांची नावे असून त्यांना एसआयटीच्या पथकाने अटक केली होती.
महम्मद सफी याला 5 दिवस तर धिरेश नाईक याला 16 दिवस न्यायालयात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावेळी होणाऱया चौकशीतून आणखी माहिती बाहेर येणार आहे.