Tarun Bharat

नावगे येथे गवताच्या ट्रॅक्टरना भीषण आग..

विदयुतभारीत तारेचा स्पर्शाने लागली आग

बेळगाव : गवताने भरलेल्या ट्रॅक्टरला विदयुतभारीत तारेचा स्पर्श होऊन लागलेल्या आगीत दोन ट्रॉली गवत व व एक गवताची गंजी जळून खाक झाली. आज (रविवारी) सकाळी ११. ३० च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सदर दोन्ही ट्रॅक्टर गवत भरून शेतातून जात असताना विदयुत भारीत तारेचा स्पर्श झाला. त्यानंतर ट्रॅक्टर मधील गवताने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. या दरम्यान प्रसंगावधान राखून ट्रॅक्टर चालक बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. तेथे असलेल्या शेतकऱ्यांनी याची माहिती तात्काळ अग्निशमनला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान यल्लाप्पा तलवार यांचे दोन ट्रॉली गवत व रामचंद्र गुरव यांची एक गवताची गंजी जळून खाक झाली. तसेच दोन्ही ट्रॅक्टरचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Related Stories

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय

Patil_p

कंत्राटी कामगारांना किमान वेतन श्रेणीचा लाभ द्या ‘

Patil_p

सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट

Amit Kulkarni

‘गो कोरोना’ म्हणून सरत्या वर्षाला निरोप

Patil_p

केएलई शेषगिरी कॉलेजच्या एमबीए बॅचचे उद्घाटन

Patil_p

मंथनतर्फे उद्या 33 वे महिला साहित्य संमेलन

Patil_p