पटना
आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव बुधवारी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पलामू न्यायालयात हजर झाले. सहा हजार रुपयांचा दंड ठोठावून न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. लालूंवर 2009 मध्ये गढवा जिह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात लालू जामिनावर बाहेर आहेत. यादव यांच्यावर आदर्श आचारसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे लालूंचे वकील धीरेंद्र कुमार सिंह उर्फ पप्पू सिंह यांनी सांगितले. याप्रकरणी आता त्यांना दिलासा मिळाला आहे.