प्रतिनिधी /बेळगाव
गोवावेस येथील मंगल ग्राऊंड येथे सुरू असणाऱया न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पो या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशातील वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले आहे. शंभरहून अधिक स्टॉलधारकांनी प्रदर्शनात सहभाग घेतला असून नाविन्यपूर्ण वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. सदर प्रदर्शन ताज थ्रेड, हँडलूम गुड्स आणि यश कम्युनिकेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओदिशा, काश्मीर, सिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथील हस्तकला कारागिरांनी बनविलेल्या वस्तू माफक दरात प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हँडमेड गिफ्ट्स, हँडमेड प्रॉडक्ट्स, आर्टिफिशियल ज्वेलरी, टेराकोटा होमडेकोर, खुर्जा क्रॉकरी, डिझायनर क्लॉथ, वाराणसी साडी, कोलकाता व आसामी साडी, भागलपूर साडी, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कार्पेट, पायपुसणी, हर्बल प्रॉडक्ट्स, होम फर्निशिंग, पुस्तके, शूज रॅक, काश्मिरी शाल व सूट, खादी कपडे, खादी हँडलूम, गुजराती पर्स, किचनवेअर, सोफासेट, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगडय़ा, टी-शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वूडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडीज कुर्ती, गाऊन, क्रॉकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चूर्ण, खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृहसजावटीसाठी लागणारे साहित्य आदी माफक दरात या ठिकाणी विक्री केले जात आहे.
हे प्रदर्शन महिनाअखेरपर्यंत चालणार असून प्रवेश आणि पार्किंगची सोय मोफत आहे. हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन केल्याची माहिती आयोजक आशु शर्मा व प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.