Tarun Bharat

‘मी ऊर्जिता’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

घरकुल प्रदर्शनात पहिला कार्यक्रम : महिलांमध्ये गुंफले स्नेहाचे बंधन

प्रतिनिधी /बेळगाव

तरुण भारत प्रस्तुत ‘मी ऊर्जिता’ या व्यासपीठाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. तरुण भारत, रोटरी क्लब वेणुग्राम, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीपीएड मैदानावर भरलेल्या घरकुल प्रदर्शनात मंगळवारी ऊर्जिता व्यासपीठाचा पहिला कार्यक्रम झाला.

या निमित्ताने आयोजित अनेक स्पर्धा, खेळ यामध्ये बहुसंख्य महिलांनी भाग घेतला आणि बक्षिसेही मिळविली. सर्व जाती, धर्माच्या महिलांचा सहभाग हे उर्जिताच्या शुभारंभाचे वैशिष्टय़ ठरले आणि खऱया अर्थाने परस्परांना सर्वस्वी अपरिचित असणाऱया महिलांमध्ये ऊर्जिताने स्नेहाचे बंध गुंफले. सर्व स्पर्धांचा निकाल आणि सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात प्रसिद्ध होणार आहे.

घरकुलअंतर्गत तांत्रिक कार्यशाळा

घरकुल 2022 प्रदर्शनांतर्गत मंगळवारी सकाळी तांत्रिक कार्यशाळा घेण्यात आल्या. बेळगाव परिसरातील नामवंत आर्किटेक्चर, बिल्डर, इंजिनियर तसेच सिमेंट कंपन्यांच्या सदस्यांनी डिप्लोमा, इंजिनियरिंग व आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बेळगाव परिसरातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

तरुण भारत पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगाव आयोजित व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या सहकार्याने ‘घरकुल 2022’ प्रदर्शन सीपीएड मैदानावर भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी तांत्रिक स्पर्धा, प्रश्नमंजुषा व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले
आहे.

मंगळवारी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, अल्ट्राटेक सिमेंटचे सुमंथ, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे सचिन कुलगोड, वेंकटेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिअल इस्टेट, गृह निर्माण क्षेत्र या संकल्पनांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

Related Stories

गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगामसाठी 12 संघांची निवड

Amit Kulkarni

उचगाव येथे आहार किटचे वितरण

Amit Kulkarni

आता दोनच दिवसांचे विकेंड लॉकडाऊन

Patil_p

शुक्रवारीही बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या दुप्पट

Patil_p

पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची चारही पदे रिक्त

Amit Kulkarni

गणेशोत्सवात पाणीपुरवठा कामगारांचा खिसा रिकामीच

Amit Kulkarni