Tarun Bharat

‘खेलो इंडिया’ विद्यापीठ क्रीडास्पर्धेला शानदार प्रारंभ

Advertisements

बेंगळूर

येथील कंठीरेवा स्टेडियमवर ‘खेलो इंडिया’ विद्यापीठ क्रीडास्पर्धेला मोठय़ा थाटात प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन क्रीडा प्रकारामध्ये आठ पदकांसाठी खेळाडूंमध्ये चुरस झाली. उत्तर महाराष्ट्राच्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविताना त्यांच्या पुरूष खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरूष आणि महिलांच्या वेटलिफ्टींग प्रकारात सहा पदकांसाठी लढती झाल्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गोविंदा सुनील महाजनने पुरूषांच्या 61 किलो वजन गटात सुवर्ण तर 55 किलो वजनगटात उदय महाजनने रौप्यपदक पटकाविले. पहिल्या दिवशीच्या दुसऱया सत्रामध्ये महिलांच्या 45 किलो वजनगटात महर्षी दयानंद विद्यापीठाच्या कोमल कोहारने सुवर्णपदक पटकाविले. कोहारने 2020 च्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक तसेच पहिल्या विद्यापीठ क्रीडास्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. सोनेपतच्या कोमल कोहारने स्नॅचमध्ये 70 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 90 किलो असे एकूण 160 किलो वजन उचलले.

नेमबाजी या प्रकारात दिल्ली विद्यापीठाच्या पार्थ माखिजाने पात्र फेरीत 628.6 गुणांसह पहिले स्थान मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पार्थने केएल विद्यापीठाच्या एम महेशचा 16-10 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. एम. महेशने रौप्य तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या गजानन खंडागळेने कांस्यपदक मिळविले. सांघिक नेमबाजी प्रकारात दिल्ली विद्यापीठाने सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पराभव करत सुवर्णपदक मिळविताना 1875.3गुण नोंदविले. मुष्टीयुद्ध या क्रीडाप्रकारात पहिल्या दिवशी विविध वजनगटातील 48 लढती झाल्या. कुरूक्षेत्र विद्यापीठाच्या शाहीन गिलने 57-60 किलो वजनगटात सलामीची लढत जिंकली. या स्पर्धेत पहिल्यांदा घेण्यात येत असलेल्या मलखांब या क्रीडाप्रकारात मुंबई विद्यापीठाने सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा 0.12 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात बुंदेलखंड विद्यापीठाने कांस्यपदक मिळविले.

Related Stories

डिसेंबर-जानेवारीत इंडिया ओपन स्पर्धा भरवू

Patil_p

आर. प्रज्ञानंदची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

10 वर्षांचा अन् 85 किलो वजनी सूमो

Patil_p

विंडीज संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ

Patil_p

विराट कोहलीने वाचवला कोरोनाग्रस्त क्रिकेटपटूच्या आईचा जीव; केली 6.77 लाखांची मदत

Tousif Mujawar

आगामी विश्व ऍथलेटिक्स स्पर्धा टोकियोत

Patil_p
error: Content is protected !!