प्रतिनिधी /बेळगाव
वेस्टार्स चषक राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा व अखिल कर्नाटक स्पोर्ट्स अँड आर्ट अकादमी आयोजित वेस्टर तायक्वांदो अकादमी द्वारे नेहरू युवा केंद्र, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत बेळगाव जिल्हा तायक्वांदो संघाने 15 सुवर्ण, 19 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 36 पदके जिकून संघाने वेस्टार्स चषक पटकाविला.
सदर स्पर्धा मिनी सब ज्युनियर, सब ज्युनियर, कॅडेट, ज्युनिअर आणि सीनिअर वयोगटांमध्ये क्मयोरुगी (स्पेरिंग) आणि पूमसे (पॅटर्न) या दोन्ही विभागात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि नवी दिल्ली येथील 1800 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
बेळगाव जिह्यातून निवडलेला कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करून मुलांच्या मिनी सब ज्युनियर वयोगटात विआन सरकारने क्मयोरुगीमध्ये रौप्य तर पूमसेमध्ये कांस्य, श्रेयसगौडा गौरीने पूमसेमध्ये रौप्य, सिद्धार्थगौडा गौरीने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तर पूमसेमध्ये सुवर्ण, वेदांत खडबडीने क्मयोरुगी व पूमसेमध्ये सुवर्ण तसेच मुलींच्या विभागात विहानी हुंदेने पूमसेमध्ये रौप्य पदक पटकाविले.
सब ज्युनियर वयोगट मुलांच्या विभागात गगन शिवपूजीमठने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तर पूमसेमध्ये रौप्य, मोहम्मद शफी चांदशाहने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तर पूमसेमध्ये रौप्य, मोहम्मद सोहेब चांदशहाने क्मयोरुगीमध्ये व पूमसेमध्ये 2 रौप्य, आरुष टूमरीने क्मयोरुगीमध्ये रौप्य तर पूमसेमध्ये सुवर्ण, पवनराज दड्डीकरने क्मयोरुगीमध्ये रौप्य तर पूमसेमध्ये सुवर्ण, आकाश डाकनाईकने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तसेच मुलींच्या विभागात राजनंदिनी पाटीलने क्मयोरुगीमध्ये कांस्य तर पूमसेमध्ये रौप्य, जिया पुजारीने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तर पूमसेमध्ये रौप्य, त्रिशा मानवने क्मयोरुगीमध्ये रौप्य तर पूमसेमध्ये सुवर्ण, स्वर्णिका शेडबाळेने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तर पूमसेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले.
कॅडेट वयोगटात मुलांचे विभागात अथर्व मांगलेने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तर पूमसेमध्ये रौप्य, स्पर्श भोसलेने क्मयोरुगीमध्ये सुवर्ण तर पूमसेमध्ये रौप्य, आदित्य डाकनाईकने क्मयोरुगीमध्ये रौप्य पटकाविले. ज्युनिअर वय घटात मुलांचे विभागात ऋतिकेश कागलेने क्मयोरुगी व पूमसेमध्ये 2 रौप्य, सुजल शिरोळेने क्मयोरुगीमध्ये रौप्य तर पुमसेमध्ये सुवर्णपदक पटकाविले.
संघाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ऍड. प्रभाकर शेडबाळे आणि भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव यांनी केले. स्वप्नील आर. पाटील यांची संघाचे प्रशिक्षक म्हणून आणि संदेश पाटील यांची संघव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय बेळगावचे तायक्वांदो रेफरी वैभव पाटील, जितेश पुजारी, श्रेया अतिवाडकर, श्रीराज पाटील, त्रिवेणी बडकन्नवर, वज्रकुमार, निशांत गायकवाड, विजय बेडगे आणि वीरकुमार सुदगडे यांनी स्पर्धेत पंचांची भूमिका बजावली आहे.