जगभरात एक वेगळी ओळख निर्माण
ग्रेटर नोएडा 32 वर्षांचा आहे. या 32 वर्षात ग्रेटर नोएडाने सतत प्रगती करत जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रेटर नोएडा हे केवळ औद्योगिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले नाही, तर गृहनिर्माण आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही इतर शहरांपेक्षा खूप पुढे गेले आहे. केवळ हिरवळ आणि रुंद रस्ते हीच इथली ओळख राहिलेली नसून त्यापलीकडे जाऊन डेटा सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, वस्त्रनगरी, तयार कपडे, वाहन या क्षेत्रात विशेष स्थान मिळवले आहे. ग्रेटर नोएडासमोर काही नवीन आव्हाने आहेत, त्यावर मात करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत.
‘निर्मिती’कथा…


@ग्रेटर नोएडा हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचे एक महत्त्वाचे उपनगर म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम दिशेला आहे. अधिकृतपणे ते उत्तर प्रदेश राज्यातील गौतम बुद्धनगर जिल्हय़ात समाविष्ट आहे. ग्रेटर नोएडा हे शहर आशियातील सर्वात मोठय़ा औद्योगिक उपनगरांपैकी एक असून ते नोएडापेक्षा आकाराने खूप मोठे आहे. त्याने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्षितिजावर आपला ठसा उमटविला आहे.
@1980 च्या दशकात राजधानी दिल्लीची लोकसंख्या वाढत असल्यामुळे नवे उपनगर वसविण्याचा विचार सुरू झाला. त्याच अनुषंगाने ग्रेटर नोएडाची निर्मिती झाली. शहरांची लोकसंख्या वाढत गेल्यास भविष्यात समस्या उद्भवू शकतात, अशी भीती व्यक्त होऊ लागल्यानेच दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरियाणा प्रांतातील काही भागात निवासी आणि औद्योगिक विकासासाठी योजनांचा विचार करण्यात आला. त्यातूनच गुडगाव, नोएडा आणि ग्रेटर नोएडा सारखी नवीन शहरे स्थापन करण्यात आली. पूर्वी नोएडा आणि ग्रेटर नोएडा भटनेर म्हणून ओळखले जात होते.
@नोएडामधील विकासाचा आढावा घेताना राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा आणखी विस्तार केल्यास भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असा विचार पुढे आला. त्याच विचारातून 1990 च्या दशकात ग्रेटर नोएडाचा पाया रचला गेला. पहिले ग्रेटर नोएडा मुख्य कार्यालय तात्पुरते नोएडाच्या सेक्टर 20 मध्ये उघडण्यात आले. सुरुवातीला वरि÷ आयएएस अधिकारी योगेंद्र नारायण यांची अध्यक्ष म्हणून आणि गणेश शंकर त्रिपाठी यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जेव्हा अल्फा, बीटा आणि गामा या सुरुवातीच्या तीन क्षेत्रांची स्थापना झाल्यानंतर त्याचे प्रशासकीय कार्यालय ग्रेटर नोएडातील रामपूर जागीर गावासमोरील सेक्टर गामा-2 मध्ये स्थापन करण्यात आले.
‘गंगाजल’ प्रकल्प
ग्रेटर नोएडाने 2022 मध्ये मोठी कामगिरी करत येथील 10 लाख लोकसंख्येसाठी गंगाजल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रेटर नोएडातील रहिवाशांना 85 क्मयुसेक ‘गंगाजल’द्वारे गोड पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात विस्तार केला जात आहे. ‘गंगाजल’ आल्याने भूजल साठय़ांची बचत होण्यास मदत होणार आहे.


रेल्वे-रोड कनेक्टिव्हिटीमध्ये आघाडीवर
ग्रेटर नोएडा हे रोड कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने सर्वोत्तम शहर असल्याचे म्हटले जाते. हे शहर पूर्वीपासून ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे, नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे, यमुना एक्स्प्रेस वेने जोडलेले आहे. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि एनएच-91 देखील याच भागातून जातात. येथील रुंद रस्ते इतर शहरांच्या तुलनेत खूपच सुबक आणि रितसर आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या निर्मितीसह, ग्रेटर नोएडा रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही इतर औद्योगिक शहरांच्या पुढे गेले आहे. येथून मुंबईकडे जाणारी मालवाहतूकही प्रभावीपणे होताना दिसते.


मोबाईल, गार्मेंट्स, डेटा सेंटर हब
@सध्या ग्रेटर नोएडा हे मोबाईल उत्पादक कंपन्यांचे हब म्हणून ओळखले जात आहे. ओप्पो, वीवो व सैमक्वांग सारख्या मोठय़ा कंपन्या येथून मोबाईल उत्पादने बनवत आहेत. केवळ देशातच नाही तर येथे तयार होणारे मोबाईल आणि त्यांची उत्पादने जगभर निर्यात केली जातात. यातून हजारो लोकांना रोजगारही मिळत आहे.
@ग्रेटर नोएडा हे कापडाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. टेक्स्टाईल आणि रेडिमेड कपडय़ांशी संबंधित शेकडो कंपन्या ग्रेटर नोएडा येथून उत्पादने तयार करून परदेशात निर्यात करत आहेत. या कंपन्या रहिवाशांसाठी, विशेषतः महिलांसाठी रोजगाराचे मुख्य स्त्राsत आहेत.
@देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर ग्रेटर नोएडामध्ये बनवले जात आहे. हिरानंदानी ग्रुपकडून गेल्यावर्षी निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या डेटा सेंटरच्या माध्यमातून एक हजार तरुणांना रोजगार आणि 7000 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. यामुळे देशातील नागरिकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. डेटा सेंटर क्षेत्रातील आणखी अनेक कंपन्या येथे त्यांचे युनिट्स स्थापन करण्यास उत्सुक आहेत. यासोबतच एलजी आणि हायर इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठय़ा कंपन्या ग्रेटर नोएडामध्ये आपली उत्पादने बनवत आहेत.


‘स्मार्ट’ इंटिग्रेटेड टाऊनशिप
डीएमआयसी आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरण यांच्यातील संयुक्त उपक्रमांतर्गत इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिप ग्रेटर नोएडा लिमिटेड (आयआयटीजीएनएल) हे टाऊनशिप विकसित करण्यात आले आहे. सुमारे 750 एकर क्षेत्रात हे औद्योगिक क्षेत्र विकसित केले गेले आहे. या टाऊनशिपमध्ये आतापर्यंत पाच ते सहा कंपन्या आपले प्रकल्प उभारत आहेत. यामध्ये हायर इलेक्ट्रॉनिक्स, फॉर्मी मोबाईल, सत्कृती इन्फोटेनमेंट, चेनफेंग (एलईडी कंपनी), जे. वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स आणि गुरु अमरदास आदींचा समावेश असून ‘स्मार्ट सिटी’प्रमाणे त्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्योगांच्या गरजेनुसार येथे ‘प्लग अँड प्ले’ पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. येथे अनेक सुविधा विकसित होत असून प्रत्येक प्लॉटमधील कचरा पाईपद्वारे प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचेल. येथील पाळत ठेवणारी यंत्रणा पूर्णपणे ऑटोमेशनद्वारे नियंत्रित केली जाणार आहे.
मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक हब
बोडाकीजवळ प्रस्तावित मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब आणि मल्टीमॉडल लॉजिस्टिक हब ग्रेटर नोएडाला नवीन स्तरावर घेऊन जाईल. या दोन्ही प्रकल्पांसाठी दादरी, जुनपत, चितेहरा, कथेडा, पल्ला, पाली, बोडकी आणि थापखेडा या आठ गावांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. हे दोन्ही प्रकल्प सुमारे 478 हेक्टर जमिनीवर विकसित केले जाणार आहेत. मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब अंतर्गत रेल्वे, बसस्थानक आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी विकसित केली जाईल. बोडकीजवळच रेल्वे टर्मिनल बांधले जाणार आहे. पूर्वेकडे जाणाऱया बहुतांश गाडय़ा येथूनच धावणार असल्याने ग्रेटर नोएडा आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना रेल्वे पकडण्यासाठी दिल्ली, नवी दिल्ली आणि आनंद विहार टर्मिनलला जावे लागणार नाही. ट्रान्सपोर्ट हबमध्येच आंतरराज्य बसस्थानकही बांधले जाणार आहे. सध्याचा नोएडा-ग्रेनो मेट्रो मार्ग मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबपर्यंत वाढवला जाणार आहे. ट्रान्सपोर्ट हबमधून लोकल बसेसही चालवण्यात येणार आहेत. त्याच वेळी, लॉजिस्टिक हबमुळे उद्योगांना मालाची वाहतूक करणे सोपे होईल. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना प्राधिकरणाच्या उद्योगांची गरज लक्षात घेता हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. लॉजिस्टिक हबमध्ये सुसज्ज गोदामेही बांधली जाणार आहेत.
ई-ऑफिससह पेपरलेस सेवा…
ग्रेटर नोएडा प्राधिकरण यापूर्वीच ‘ई-ऑफिस’मध्ये रुपांतरित झाले आहे. प्राधिकरणामध्ये सर्व नोंदी ई-फाईल्स स्वरुपात उपलब्ध आहेत. तक्रारदाराने कागदावर अर्ज आणला तरी तो स्कॅन करून त्याची ई-फाईल बनवली जाते. त्यावर वरि÷ अधिकाऱयांकडून मंजुरी दिली जाते. अधिकृतता पूर्णपणे पेपरलेस झाली आहे. यासोबत वन मॅप ग्रेटर नोएडाद्वारे कोणत्याही मालमत्तेचे स्थान ऑनलाईन पाहता येते. शहरातील रस्ते, गटार-पाण्याची लाईन, बाजारपेठ, मॉल किंवा पोलीस स्थानके आदींचे नकाशेही ऑनलाईन उपलब्ध आहेत. ग्रेटर नोएडा प्राधिकरण सामान्य लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपद्वारे 24 तास जोडलेले आहे. येथील रस्त्यांची देखरेख करण्यासाठी प्राधिकरणाने जीआयएस मॅपिंग केले आहे. कोणता रस्ता कधी दुरुस्त झाला, किती वर्षे रस्त्याची दुरुस्ती करावी लागणार नाही, हे सर्व ‘जीआयएस’वरून लगेच लक्षात येते. निर्धारित वेळेपूर्वी रस्ता खचल्यास संबंधित कंत्राटदाराकडून पुन्हा त्याच रकमेत दुरुस्ती केली जाते.
नागरी सुविधांवर विशेष लक्ष…
@येथील रहिवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सीईओ रितू माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेटर नोएडा प्राधिकरण अनेक मूलभूत सुविधांवर काम करत आहे. सर्व जुन्या समुदाय केंद्रांची दुरुस्ती केली जात आहे. गावागावात लग्नमंडप बांधले जात आहेत. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडांगणे विकसित केली जात आहेत. दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रात वेडिंग झोन तयार केले जात आहेत.
@ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्या सीईओ रितू माहेश्वरी यांनी ग्रेटर नोएडाला स्वच्छतेच्या पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. घनकचरा आणि सी अँड डी कचऱयानंतर आता ई-कचऱयावरही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना जागरुक करण्यासाठी सातत्याने मोहिमा राबवल्या जात आहेत.
@येथील गावांना आदर्श गाव बनविण्याचे कामही सुरू आहे. रस्त्यांच्या बाजूला शौचालये बांधली जात आहेत. प्रत्येक गावात आणि सेक्टरमधील प्रत्येक घरातून कचरा उचलण्याच्या योजनेवरही काम सुरू आहे. ग्रेटर नोएडाची हिरवळ सुधारण्यावरही भर आहे. ग्रेटर नोएडाला स्वच्छतेच्या पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्राधिकरणाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
@ग्रेटर नोएडाची ओळख वाढविण्यासाठी प्राधिकरण प्रयत्नशील आहे. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या माध्यमातून ग्रेटर नोएडामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगाराचे दरवाजे उघडले जात आहेत. उद्योगांना भूखंड देण्यासाठी आठ नवीन क्षेत्रे विकसित केली जात आहेत. आता ‘33’व्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये या क्षेत्रांचा विकास आणि वाटप करण्याचे प्राधिकरणचे लक्ष्य आहे.
@ नोएडाला पर्याय म्हणून 1990 च्या सुमारास निर्मिती
@ जागतिक गुंतवणूकदार समिटमधून गुंतवणूक स्वयंरोजगार
@ रस्ते जोडणीच्या बाबतीत एनसीआरमध्ये आघाडीवर