आवक सुरू, मागणीत वाढ : ठिकठिकाणी हिरवा वाटाणा 120 रु. किलो दराने विक्री
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारात हिरवा वाटाणा आणि हरभरा दाखल होऊ लागला आहे. एरव्ही डिसेंबरमध्ये दाखल होणारा वाटाणा व हरभरा यंदा नोव्हेंबरमध्येच आला आहे. त्यामुळे नागरिकांकडून चव चाखण्यासाठी वाटाणा आणि हरभऱयाची खरेदी केली जात आहे. हिवाळय़ाला सुरुवात झाल्यानंतर गृहिणींना हिरव्या वाटाण्याची प्रतीक्षा असते.
मागील चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचबरोबर वाटाण्याच्या शेंगा आणि ओला हरभरा येऊ लागला आहे. हिवाळय़ात याला विशेष मागणी असते. त्यामुळे गृहिणींकडून खरेदी केला जात आहे. अतिपावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर भरमसाट वाढले आहेत. त्याचबरोबर कडधान्यांचा दरही भडकला आहे. हिरवा वाटाणा 120 रु. किलो तर हिरवा हरभरा 10 रुपये पेंडीप्रमाणे विकला जात आहे.
गतवषी परतीचा पाऊस अधिक प्रमाणात झाला होता. त्यामुळे हिरवा वाटाणा आणि हरभऱयावर परिणाम झाला होता. मात्र यंदा पाऊस वेळेत कमी झाला आहे. त्यामुळे वाटाणा आणि हरभरा पीक जोमाने येत आहे.
दररोजच्या आहारात भाजीची चव वाढविण्यासाठी हिरव्या वाटाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे गृहिणींकडून वाटाण्याला पसंती दिली जात आहे. हिवाळय़ात वाटाण्याचे उत्पादन होते. त्यामुळे बाजारात धारवाड, बैलहोंगल आदी ठिकाणांहून हिरवा वाटाणा आणि हरभरा दाखल होऊ लागला आहे. काकतीवेस, समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनिवार खूट आणि मुख्य बाजारपेठेत विक्री होत आहे.