प्रतिनिधी /पणजी
राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
महान शिक्षक, तत्त्वज्ञानी, शिक्षणतज्ञ आणि प्रगल्भ मानवतावादी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शब्दात सांगायचे तर जर देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर विचारांचे राष्ट्र बनवायचे असेल, तर पिता, माता आणि शिक्षक हे तीन प्रमुख सामाजिक सदस्य आहेत जे बदल घडवू शकतात. हे अद्भूत शब्द शिक्षकांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांचे मन, शरीर, चारित्र्य, क्षमता आणि भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावितात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नवीन आत्मनिर्भर भारताच्या यशामध्ये शिक्षकांवर महत्त्वाची भूमिका सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडूनही शिक्षकांना शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहे आणि पुढे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात त्यांनी बजाविलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
शैक्षणिक आणि भावनिक मार्गदर्शन केल्याबद्दल आपण आपल्या शिक्षकांचे सदैव ऋणी असलो पाहिजे. कोविड-19 महामारीने शिक्षण क्षेत्राला जवळपास दोन वर्षांपासून मोठा फटका बसला आहे आणि तो अजूनही सावरण्यासाठी धडपडत आहे. या वषी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाले आहेत. तथापि, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनाला त्रास होऊ नये म्हणून शिक्षक ऑनलाइन शिक्षण देण्याच्या नवीन नियमांचा अवलंब करताना पाहून मी प्रोत्साहित झालो आहे. हे खूप आव्हानात्मक काम आहे आणि जरी ते शारीरिक वर्गा?सारखे वातावरण देऊ शकले नाही तरीही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ते निर्धाराने आणि कल्पकतेने स्वीकारले आहे हे पाहून मला आनंद होतो. मी राज्यभरातील सर्व शिक्षक पुरस्कारप्राप्त मानकऱयांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.