Tarun Bharat

म. ए. युवा समितीच्यावतीने शाहू महाराजांना अभिवादन

प्रतिनिधी / बेळगाव

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. 100 वी स्मृती शताब्दी म्हणून सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध थांबून छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली.

युवा समिती कार्यालयात थांबून तसेच जे कार्यकर्ते विविध ठिकाणी होते त्यांनीही 100 सेकंद थांबून मानवंदना दिली. प्रास्ताविक श्रीकांत कदम यांनी केले. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, इंद्रजित धामणेकर, किरण मोदगेकर, सिद्धार्थ चौगुले आदी उपस्थित होते.

Related Stories

पावसाची भीषण खेळी, घेतला 7 जणांचा बळी

Amit Kulkarni

येळ्ळूर मारहाण खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ

Rohit Salunke

नार्वेकर गल्ली जोतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Patil_p

पत्रकार विकास अकादमीच्यावतीने आज पत्रकार दिन

Patil_p

कन्नड-सांस्कृतिक खात्यातर्फे शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

खानापुरात पाच दिवसांच्या गणरायांना निरोप

Amit Kulkarni