नवी दिल्ली
बिर्ला ग्रुप अंतर्गत येणाऱया ग्रेसिम इंडस्त्रीजला आगामी काळामध्ये बांधकाम साहित्यासंबंधी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्थापन करायचा आहे. या अंतर्गत कंपनी आगामी काळामध्ये 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे.
सदरची गुंतवणुक आगामी 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. कंपनी व्यवसाय ते व्यवसाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्थापन करणार आहे. नुकतीच कंपनीने वर्ष 2025 पर्यंत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. गुंतवणुकीच्या माध्यमातून ई-कॉमर्स व्यवसायामध्ये उतरण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. बांधकाम साहित्याच्या व्यवसायाला विस्तारण्यासाठी आज अनेकविध संधी असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. ई-कॉमर्सच्या सहाय्याने व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.