कोळसा खाणीविरोधात करत होती निदर्शने
वृत्तसंस्था/ बलिंन
जर्मनीच्या लुएत्जेरथ गावाला वाचविण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक लोक आंदोलन करत आहेत. तर आंदोलकांना हटविण्यासाठी शेकडो पोलीस कर्मचाऱयांना तैनात करण्यात आले आहे. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग येथील लोकांचे समर्थन करण्यासाठी पोहोचल्यावर जर्मनी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. थनबर्गने अनेक लोकांसोबत मिळून जर्मनीचे शहर कोलोन आणि डसेलडोर्फमध्ये प्रांतीय सरकारच्या इमारतीनजीक निदर्शने केली. कोळसा खाणीच्या विस्तारासाठी रस्ता तयार केला जात असून याकरता जर्मनीतील लुएत्जेरथ गाव विस्थापित करण्याची योजना आहे.
यापूर्वीही कोळसा खाणीच्या विरोधात हजारो लोकांनी निदर्शने केली होती. त्यानंतर पोलीस आणि आरडब्ल्यूई या ऊर्जा कंपनीने 11 जानेवारी राजी लुएत्जेरथमधून निदर्शकांना हटविण्यास सुरुवात केली होती. 18 वर्षीय ग्रेटा ही हवामान बदल रोखण्यासाठी काम करत आहे. हवामान बदल रोखण्याच्या मोहिमेंतर्गत तिने स्वीडनच्या संसदेबाहेर दर शुक्रवारी निदर्शने केली होती. तिच्या या हॅशटॅग फ्रायडेज फॉर फ्यूचरसोबत जगातील अनेक देश जोडले गेले होते. आता जगभरातील हजारो मुले ग्रेटाप्रमाणेच हवामान बदलाच्या विरोधात आवाज उठवत आहेत.