विकासासाठी भरघोस मतदान करण्याचे आवाहन
बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे बेळगाव उत्तरचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी रविवारी न्यू गांधीनगर, मारुतीनगर परिसरात जोरदार प्रचार केला. 10 मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी बेळगाव उत्तरच्या विकासासाठी नागरिकांनी भरघोस मतदान करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. विकासाच्या बाबतीत भाजप शिवाय पर्याय नाही हे नागरिकांना माहिती आहे. मागील 15 वर्षांत जे जमले नाही ते मागील पाच वर्षांत भाजपने बेळगाव उत्तरमध्ये करून दाखविले. प्रत्येक घराला पायाभूत सुविधा, उत्तम दर्जाचे रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे. रवी पाटील यांनी ऑटोमोबाईल व चार्टर्ड अकाऊंटंट सदस्यांची बैठक घेतली. डॉ. रवी पाटील यांनाच आपण विजयी करू, असा निर्धार सदस्यांनी केला. तसेच व•रवाडी येथे बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. आमदार होण्याची एक संधी द्या व•रवाडीचा कायापालट करू, असे त्यांनी सांगितले. बाकलकोट येथील डॉ. लिंगराज चंदरगी यांनी रवी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चव्हाट गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, शेट्टी गल्ली भागात घरोघरी जाऊन त्यांनी झंझावाती प्रचार केला.