आरबीआयच्या अनुमानापेक्षा अधिक दर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) विकासदर वार्षिक आधारावर 1.3 टक्क्यांनी वाढून 7.60 टक्के राहिला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाहीत हे प्रमाण 6.3 टक्के राहिले होते. तर मागील तिमाहीत विकासदर 7.8 टक्के राहिला होता.
जीडीपी विकासदर आरबीआयच्या अनुमानापेक्षा 1.1 टक्क्यांनी अधिक आहे. आरबीआयने दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के विकासदर राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केला होता. अपेक्षेपेक्षा अधिक विकासदर शहरातील मोठी मागणी, निर्मिती आणि मोठ्या शासकीय खर्चामुळे गाठता आला आहे. उत्पादन क्षेत्राचा विकासदर 13.9 टक्के राहिला आहे. तर बांधकाम क्षेत्राचा विकासदर 13.3 टक्के राहिला आहे.
ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड म्हणजेच जीव्हीए दुसऱ्या तिमाहीत 7.4 टक्के राहिला आहे. जीव्हीए 6.8 टक्के राहण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता. तर पहिल्या तिमाहीत जीव्हीए 7.8 टक्के राहिला होता.
तर दुसरीकडे एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत आर्थिक तूट वाढून 8.04 लाख कोटी रुपये झाली आहे. अर्थसंकल्पीय अनुमानाच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्के इतके आहे. आर्थिक तुटीचे लक्ष्य 17.86 लाख कोटी रुपये इतके आहे. मागील वर्षी याच कालावधीत आर्थिक तूट 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अनुमानाच्या 45.6 टक्के होती.
चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकासदराचा अनुमान एसअँडपीने वाढवत 6.4 टक्क केला आहे. यापूर्वी अनुमानित विकासदर 6 टक्के होता. देशांतर्गत अर्थचक्राला मिळालेल्या मोठ्या गतीमुळे विकासदर वाढणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.