क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस आयएमईआर चषक निमंत्रितांच्या आंतरमहाविद्यालय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जीएसएस महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. त्याबद्दल एसकेई सोसायटी व महाविद्यालयातर्फे खेळाडूंचा खास सत्कार करण्यात आला.
जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या आमएमईआर चषक आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना जीआयटी व जीएसएस यांच्यात झाला. या सामन्यात जीआयटी संघाने विजेतेपद पटकाविले. तर जीएसएस संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघाचे यश पाहून एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, सभासद नित्यानंद करमळी, प्राचार्य व्ही. एल. मजुकर व एसकेईच्या सभासदांच्या हस्ते या संघाचे कौतुक करण्यात आले. या संघाला 10 हजार रूपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले होते. पालाश कलघटगीला उत्कृष्ट गोलरक्षक, मॅन ऑफ दि मॅच प्रांजल पिंटो यांना खास चषक देवून गौरविण्यात आले. या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संघाचे नेतृत्व लक्ष्मीनारायण मुदलीयारने केले. या संघाला क्रीडा प्राध्यापक प्रशांत मनकाळे यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य बी. एल. मजुकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे.