मागील वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 28 टक्के वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जुलै महिन्यात 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपये इतके जीएसटी संकलन झाले आहे. सप्टेंबर 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा संग्रह आहे. ही रक्कम मागील वषीच्या याच महिन्यात जीएसटी संकलनाच्या रकमेपेक्षा 28 टक्के अधिक आहे. जीएसटी संकलनाच्या या रकमेपैकी 25,751 कोटी रुपये सीजीएसटी, 32,807 कोटी रुपये एसजीएसटी आणि 79,518 कोटी रुपये आयजीएसटी अंतर्गत जमा झाले आहेत.
जीएसटी संकलनाबाबत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आयात केलेल्या वस्तूंवर कर म्हणून 41,420 कोटी रुपये जमा झाले. याशिवाय 10,920 कोटी रुपये उपकर म्हणून वसूल करण्यात आले आहेत. देशात आयात होणाऱया मालावर 995 कोटी रुपयांचा उपकर लावण्यात आला आहे. जुलैमध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 48 टक्क्मयांनी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून महसूल गेल्या वषी याच महिन्यात या स्त्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 22 टक्क्मयांनी जास्त होता. जीएसटी वसुलीची ही आकडेवारी अर्थ मंत्रालयाने सोमवारी जाहीर केली आहे.
सलग पाचव्या महिन्यात 1.40 लाख कोटींवर
जीएसटी सुरू झाल्यापासून मासिक जीएसटी संकलनाने 1.40 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही सहावी वेळ आहे. दर महिन्याला जीएसटीच्या आकडय़ांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी जून महिन्यात जीएसटी संकलन 1.44 लाख कोटी रुपये होते. सलग पाच महिन्यांत एकूण जीएसटी संकलनाची रक्कम 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एप्रिल 2022 मध्ये जीएसटी संकलनाने 1.68 लाख कोटी रुपये या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला होता.
जीएसटी कौन्सिलच्या निर्णयांचा परिणाम
जुलै 2022 पर्यंत जीएसटी महसुलातील वाढ गेल्यावषीच्या याच कालावधीच्या तुलनेत मोठी आहे. संकलनात वर्षभरात 28 टक्क्मयांनी वाढ होण्याबरोबरच सलग दुसऱया महिन्यातही वाढ झाली आहे. जीएसटी कौन्सिलने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाचे चांगले अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या विविध उपाययोजनांचा हा स्पष्ट परिणाम असल्याचे सांगण्यात आले. कौन्सिलने घेतलेल्या सकारात्मक निर्णयांचा आर्थिक पुनर्प्राप्तीसह जीएसटी महसुलातून सरकारला लाभ होताना दिसत आहे.