Tarun Bharat

अप्रत्यक्ष कराचे ध्येय प्राप्त करण्यास जीएसटी संकलन ठरणार उपयुक्त

2022-23 मध्ये अप्रत्यक्ष कर संकलनात चांगली वाढ

वृत्तसंस्था /मुंबई

2022-23 मध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ने अप्रत्यक्ष कर संकलनात मोठय़ा प्रमाणात महसूल वाढीचे ध्येय गाठले असूनही कर कपातीमुळे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क संकलनावर परिणाम झाला आहे. यामध्ये कर संकलनात वाढीसाठी मदत करणार असल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱयाने दिली.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले की, सरकारने करात कपात केल्यामुळे, चालू आर्थिक वर्षात सीमाशुल्क आणि केंद्रीय अबकारी संकलन आव्हानात्मक राहणार आहे. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जोहरी म्हणाले, ‘जर तुम्ही अप्रत्यक्ष ध्येयाबद्दल बोललात तर मला खात्री आहे की आम्हाला ते मिळेल.’ 

सर्वाधिक वाढ जीएसटीमधून होत असून, गेल्या दोन महिन्यांत चांगला महसूल मिळाला आहे. ते म्हणाले, ‘जीएसटीमधील वाढ पाहता, मला विश्वास आहे की आम्ही महसुलाचे ध्येय साध्य करणार असल्याचे जोहरी म्हणाले.

Related Stories

मंदीच्या तप्त वातावरणातली झुळूक!

Patil_p

रिझर्व्ह बँकेकडून 132 टन सोने खरेदी

Patil_p

जगातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रक

Patil_p

जॉयआलुक्कासचा येणार आयपीओ

Patil_p

पडझडीच्या सत्रात बाजार सावरला

Amit Kulkarni

जीपीएफच्या व्याजदरात कपात

Patil_p