ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या झवेरी बाजार (Zaveri Bazaar) परिसरात जीएसटी विभागाने (GST Department) धडक कारवाई करत भिंतीत लपवलेली 10 कोटींची रोकड आणि 19 किलोच्या चांदीच्या विटा जप्त केल्या. चामुंडा बुलियन कंपनीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली असून, जीएसटी विभागाने ही जागा सीलबंद केली आहे. (The premises of the company has been sealed) प्राप्तिकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
झवेरी परिसरातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल 2019-20 मध्ये 22.83 कोटी होते. 2020-21 मध्ये ती 652 कोटी तर 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांवर गेली. जीएसटी विश्लेषणात ही बाब समोर आल्याने जीएसटी विभागाने कंपनीवर छापा टाकला. यावेळी कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी असल्याचे आढळून आली. तसेच कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोटय़ा जागेत भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. कारवाईनंतर कंपनीचा परिसर सील करण्यात आला असून, प्राप्तीकर विभागाला यासंदर्भात कळविण्यात आले आहे.