Tarun Bharat

जीएसटीचे नवे दर आजपासून लागू

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचे ( GST ) नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा भार कमी होणार आहे. जीएसटी परिषदेमध्ये ४७ वी बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या निर्णयांनुसार नवे दर लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, धनादेश देण्यासाठी बँका आता १८ टक्के जीएसटीची आकारणी करणार आहे. तसेच प्रतिदिन हजार रुपयांपेक्षा अधिक असलेल्या हॉटेलच्या खोलीच्या भाड्यावर १२ टक्के कर लागेल. सोलर हिटरवर पूर्वी ५ टक्के लागणारा जीएसटी आता १२ टक्के झाला आहे. तर इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावरचा जीएसटी ५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर गेला आहे.

रोप वे च्या माध्यमातून प्रवासी आणि मालवाहतूकीचे कर १२ टक्के वरून ५ टक्क्यांवर आला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठीही ५ टक्के जीएसटी लागणार आहे. त्याचबरोबर ब्रँडिंग नसलेल्या दाळी, पीठ यांच्या २५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या पॅकिंगला जीएसटी लागू होणार नाही. किरकोळ विक्रीसाठी असलेल्या पॅकिंगला मात्र जीएसटी द्यावा लागेल, तांदळाच्या ५० किलोचं पॅकिंगला मात्र जीएसटी द्यावा लागणार नाही. असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केले आहे.

Related Stories

आंब्याचं लोणचं पडलं महागात, 100 ग्रामस्थ विलगीकरणात

Patil_p

मारुती सुझुकीचा नफा दुप्पट

Patil_p

‘डेल’ ने केली 6,650 जणांची कपात ?

Patil_p

पंजाबच्या 10 नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

datta jadhav

ममतादीदी एकाकी, डावे-काँग्रेसचा आघाडीस नकार

Patil_p

भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहणार

Patil_p