Tarun Bharat

पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्यांच्या रांगेत शरद पवारांनी बसू नये

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची पवारांवर खरमरीत टीका; पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या ‘जनहित’चे संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सोलापूर प्रतिनिधी

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मला असे वाटते अन्य पुढारी जे स्वप्नरंजन करतात, ते स्वप्नरंजन करणाऱ्या यादीत त्यांनी सामील होणे म्हणजे ते दुर्दैव आहे. रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे भरपूर आहेत, त्यांच्यावर का अन्याय करता. त्यांना त्यांचे भविष्य सांगू द्या की, पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्याच्या रांगेत शरद पवारांनी बसू नये, अशी खरमरीत टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर सोलापुरात केली.

शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील सोलापूर जिह्याच्या दौऱ्यावर आले होते. सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवनात बैठक घेतल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली.
2024 पर्यंत देशात बदलाचे वारे वाहू लागतील, असे राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणत असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मला असे वाटते की, महाविकास आघाडीतील नेत्यांना आता भविष्य सांगण्यात मजा येत आहे. रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांची संख्या भरपूर आहे, पवारांनी त्या रांगेत जाऊ नये, भविष्य सांगणाऱ्यांवर अन्याय का करता असा टोलाही पालकमंत्री विखे पाटील यांनी लगावला आहे.

निवडणुकीच्या एका निकालाने मुंगेरीलाल के हसीन स्वप्ने पाहू नये
कसबा पोटनिवडणुकीच्या एका निकालामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये स्वप्नरंजने रंगू लागली आहेत. एका निकालावरून मुंगेरीलाल के हसीन स्वप्ने बघू नये, असा टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना पालकमंत्री विखे-पाटील यांनी लगावला आहे.

पालकमंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे : देशमुख
कांद्याला योग्य भाव मिळावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे जिल्हा नियोजन भवन येथे आले होते. त्यांना पालकमंत्र्यांशी भेटायला न दिल्यामुळे त्यांनी सभागृहाच्या बाहेरच एकच गोंधळ घालायला सुऊवात केली. पालकमंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, पालकमंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, पालकमंत्र्यांची गाडी फोडली पाहिजे, पालकमंत्र्याचं करायचं काय, खाली मुंडक, वर पाय अशी घोषणाबाजी करत उपस्थित पोलिसांसोबत हुज्जत झाली. अखेर पोलिसांनी देशमुख यांना ताब्यात घेतले. यावेळी सोलापूर जिह्याचा पालकमंत्री बदला अशी मागणी देशमुख यांनी केली.

Related Stories

आज मुंबईत लसीकरण बंद

Archana Banage

सोलापूर : वैराग मधील कोविड सेंटर त्वरीत सुरु करा

Archana Banage

मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सुकाणु समिती

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 लाखांहून अधिक

Tousif Mujawar

ट्विटर वरून नको, समोर येऊन बोला

Tousif Mujawar

पिस्टलसह गावटी कट्टा हस्तगत

Patil_p