Tarun Bharat

पालकमंत्री रवींद्र चव्हाण ७ ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर

Advertisements

Guardian Minister Ravindra Chavan on district tour on 7th October

सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण ७ ऑक्टोबर २०२२रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कुडाळ येथे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. ७ ऑक्टोबर २०२२रोजी सकाळी ८.३० ला कुडाळ येथे कोकणकन्याने आगमन, त्यानंतर १० ते १०.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकप्रतिनिधी बैठक, १०.३० ते ११.३० जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक होणार आहे.


११.३० ते १२.३० सावंतवाडी विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक, १२.३०ते १.३० कुडाळ विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक होणार असून या दोन्ही बैठका वसंतस्मृती कार्यालय ओरोस येथे होणार आहेत.


१.३० ते २.३० राखीव २.३० ते ३.३० कणकवली विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे होणार आहे. तरी भाजपा सर्व पदाधिकारी यांनी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ला कुडाळ रेल्वे स्थानक येथे स्वागतासाठी व वरील संघटनात्मक बैठकीना उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

Related Stories

राणेंच्या फोटोची ऍलर्जी आहे का?

NIKHIL_N

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत

Anuja Kudatarkar

महोदय पर्वणीनिमित्त मोरयाचा धोंडा समुद्रकिनारी भाविकांचा जनसागर

Anuja Kudatarkar

हरहर विठ्ठल, घरघर विठ्ठल..

Patil_p

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांकडून डेगव्याच्या सुपुत्राचे कौतुक

Tousif Mujawar

कोरोना रूग्णांना खराब औषधे!

Patil_p
error: Content is protected !!