Tarun Bharat

पेरू खाण्याचे फायदे जाणून घ्या

पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते. फॉलिक अॅसिड, पोटॅशिअम, तांबे आणि मँगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात.

पेरू खाण्याचे असे आहेत फायदे

पेरू बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला असता मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.

मलावरोधाचा त्रास होत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करावे किंवा त्याची भाजी बनवून खावी, यामुळे आतडय़ांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होते.

गर्भवती स्त्रिया, अशक्त स्त्रिया यांनी पेरूचे नियमित सेवन करावे. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते.

गर्भवती स्त्रीला जर उलटी, मळमळ होत असेल तर पेरूचे सरबत पीत राहावे. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन उलटी, मळमळीची भावना कमी होऊन भूक चांगली लागते.

दाताचे विकार असतील तर पेरूच्या पानांचा रस करून गुळण्या कराव्यात.

पेरू पासून चटणी, जाम, मुरांबा, भाजी सुद्धा करता येते.

ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी किमान रोज एक तरी पेरू खावा.

पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते.

Advertisements

Related Stories

अधोमुखवृक्षासन

Omkar B

ओआरएसची संजीवनी

Amit Kulkarni

लस ठरतेय बुस्टर

Amit Kulkarni

समस्या स्लिप डिस्कची

Amit Kulkarni

जेवणा नंतर आंबे खाताय? शरीरावर काय परिणाम होतो, जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Shinde

पृष्ठ मुद्रा

Omkar B
error: Content is protected !!