Tarun Bharat

गुढी पाडवा आणि डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन दुकानदारांना क्रेडिटवर ‘आनंदाचा शिधा’

सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न पुरवठा मंत्री यांचे आभार

सातारा प्रतिनिधी

राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अव्वर सचिव पूजा मानकर यांच्या स्वाक्षरीचे परीपत्रक दि.16रोजी काढण्यात आले असून त्यात येणाऱ्या गुढी पाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्याची कार्य पद्धती नमुद करण्यात आली आहे. त्या बद्दल सातारा रेशन दुकानदार संघटनेने विभागीय आयुक्त यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले असून राज्यभरात मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

राज्याच्या अन्नव नागरी पुरवठा विभागाचे दि.16 रोजी परिपत्रक निघाले आहे. त्यात येणाऱ्या गुढी पाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाची वितरण व्यवस्थेबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार शिधा जिन्नस संच 100 रुपये दराने वितरित करायचे आहेत.विक्री पोटी मिळणारी रक्कम रेशन दुकानदारांनी मार्जिन वजा करून उर्वरित रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे वितरणानंतर जमा करावी, शिधा जिन्नस संचाची विक्री करण्यासाठी 4 सप्टेंबर 2017 च्या परिपत्रकानुसार रेशन दुकानदार यांना मार्जिन देय राहील. सातारा जिल्ह्यासाठी 3 लाख 81 हजार 531 एवढे शिधा संच येणार आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
शासनाचे आभार

सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने आनंदाचा शिधा किट सर्व दुकानदारांना क्रेडिटवर मिळणे बाबत दि. 8 मार्च 2023 रोजी उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांना एक निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने उपायुक्तांनी शासनाला त्यांच्या अभिप्रायासह संघटनेची मागणी कळवली होती. आपल्या या मागणीचा महाराष्ट्र शासनाने सकारात्मक विचार करून परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार आनंदाचा शिधा किट दुकानदारांना क्रेडिटवर मिळणार आहे. आनंदाचा शिधा किट ग्राहकांना विक्री केल्यानंतरच दुकानदारांचे कमिशन वजा जाता प्रत्येक दुकानदाराने पैसे भरण्याचे आहेत. सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण तसेच , पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांचे संघटनेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो.
श्रीकांत शेटे- जिल्हाध्यक्ष रेशन दुकानदार संघटना, सातारा जिल्हा.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 373 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

Archana Banage

सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांचा गौरव

Archana Banage

लाखोंच्या पोशिंदा बळीराजाला ओळख कोण देणार ?

Patil_p

सातारा : ‘त्या’ वनकर्मचार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Archana Banage

सातारा : …उरली फक्त निवडीची घोषणा बाकी!

Archana Banage

ठेकेदाराचे अजब गजब कार्य

Patil_p