धर्मस्थळ संघाच्यावतीने आयोजन : अधिकाऱयांकडून शेतकरी-महिलांना महत्त्वपूर्ण माहिती
वार्ताहर /कुदेमनी
येथील धर्मस्थळ महिला संघाच्यावतीने मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम प्राथमिक मराठी शाळेच्या कै. मारुती भ. पाटील सभामंडपात नुकताच झाला. प्रारंभी महिला मंडळाच्या प्रतिनिधी कल्पना नाईक यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते.
ग्रामपंचायत अध्यक्षा रेणुका नाईक, पीडीओ लीला मेस्त्राr व पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उचगाव विभाग धर्मस्थळ संस्थेचे पर्यवेक्षक गणपती नाईक व सी.एस.सी. केंद्राच्या प्रतिनिधी मलप्रभा नंद्याळकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागात शेतीत पिके पिकविली जातात. काही वेळा अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान होते. भात, सोयाबीन, गहू, मका यासारख्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होऊन पिके खराब होतात. यामुळे शेतकऱयांची मोठय़ा प्रमाणात हानी होते. यासाठी पंतप्रधान फसल बिमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळू शकते. नुकसान झाल्यानंतर 72 तासांपर्यंत कृषी अधिकाऱयांना नुकसानीची माहिती देण्याची आपण खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन यावेळी करून महिलांच्या सोयीबाबत विविध योजनांची माहिती अधिकाऱयांनी यावेळी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या विमल साखरे, लता शिवणगेकर, आरती लोहार, उल्का जाधव, साहाय्यिका अनिता पाटील आदींसह महिला उपस्थित होत्या. रेणुका भातकांडे यांनी आभार मानले.