राष्ट्रीय महिला आयोगाची कठोर भूमिका ः सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिशानिर्देश जारी केले आहेत. यात कोचिंग किंवा शैक्षणि संस्थांना निर्देश देण्याची सूचना करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था चालविणाऱयांची पार्श्वभूमी पडताळून पहावी असा निर्देश आयोगाने मुख्य सचिवांना दिला आहे.
कार्यस्थळी महिलांचे लैंगिक शोषण (प्रतिबंधक, निषेध आणि निवारण) अधिनियम, 2013 चे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यात यावे असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितले आहे. सर्व संबंधित घटकांदरम्यान अधिनियमासंबंधी जागरुकता कार्यक्रम आयोजित कण्याचा निर्देश अधिकाऱयांना देण्यात यावा असे आवाहन शर्मा यांनी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना केले आहे.
कोचिंग सेंटर नोंदणीकृत आहे की नाही याचीही खातरजमा केली जावी. तसेच अशाप्रकारच्या शैक्षणिक केंद्रांना चालविणाऱया लोकांच्या पार्श्वभूमीची पडताळणी करण्यात यावी असे सूचना आयोगाने केली आहे.