होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा
विवाहित लोकांना पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवणे किती आवश्यक आहे चांगलेच माहित असावे. वाढदिवस लक्षात न राहिल्याने पत्नी घर सोडून गेल्याच्या अनेक कहाण्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. अनेकदा तर वाढदिवस विसरल्यास पत्नी कित्येक महिन्यांपर्यंत पतीशी बोलत नाही. परंतु एका देशात पत्नीचा वाढदिवस विसरणे हा गुन्हाच आहे. पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी रितसर कायदा लागू करत तरतूद करण्यात आली आहे. पत्नीचा वाढदिवस विसरल्यास पतीला 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
समोआ हा देश स्वतःच्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हा देश स्वतःच्या अजब कायद्यांमुळेही वारंवार चर्चेत येत असतो. येथील कायदे अत्यंत कठोर असून त्यांचे पालन देखील पूर्ण कठोरपणे केले जाते. येथे जर कुठल्याही पतेने स्वतःच्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर तेथे हा एक मोठा गुन्हा मानला जातो. पत्नीचा वाढदिवस विसरण्याच्या पहिल्या घटनेत इशारा पतीला इशारा दिला जातो. हीच चूक पुन्हा केल्यास पतीला दंड भरावा लागू शकतो किंवा तुरुंगात जावे लागू शकते. पत्नीने तक्रार केल्यास पतीला 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
अनेक ठिकाणी अनोखे कायदे
केवळ समोआ या देशात अजब कायदे नाहीत. जगातील अनेक देशांमधील कायदे जाणून घेतल्यावर हसू आवरता येणार नाही. यातील अनेक कायदे तर कित्येक दशके जुने आहेत. उत्तर कोरियात जर कुणी निळय़ा रंगाची जीन्स परिधान करून घराबाहेर पडला तर ते कृत्य अवैध मानले जाते. पूर्व आफ्रिकेत लोकांना जॉगिंगसाठी बाहेर पडता येत नाही. कारण या देशात यावर बंदी घालण्यात आली आहे. ओक्लाहोमामध्ये राहत असताना श्वानाला पाहून स्वतःचा चेहरा वेडावाकडा केल्यास तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तर जर्मनीच्या शहरात महामार्गावरील प्रवासादरम्यान वाहनातील इंधन संपल्यास आणि वाहन तेथेच सोडल्यास तुरुंगात रवानगी होते.