ऑनलाईन टीम/भारत
गुजरातमध्ये (Gujarat) एटीएसकडून (ATS) मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून (Mundra Port) मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. एटीएसने ७० किलो हेरॉइन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत जवळपास ३५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, एटीएसने गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा बंदर येथून एटीएसने हेरॉइनचा मोठा साठा जप्त केला आहे. ७० किलो हेरॉइन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत जवळपास ३५० कोटी रुपये आहे. एटीएसला ड्रग्जच्या साठ्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. हेरॉइन येथील एका कंटेनरमध्ये आढळला आहे. हा कंटेनर दुबईच्या जेबेल अली पोर्टमधून भारतात आला होता, अशी माहिती समजते.
हे ही वाचा : शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार; संजय राऊतांचे संकेत
एटीएसने जप्त केलेलं ड्रग्ज हे मध्यपूर्वेतून भारतात आणण्यात येत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी देखील फेब्रुवारी महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवरील एका जहाजातून २ हजार कोटींहून अधिक किमतीचे ७५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुद्धा नऊ पाकिस्तानी नागरिकांसह २८० कोटी किमतीच्या हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एटीएसने अटक केली होती. तसेच मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात मुंद्रा बंदरावर ड्रग्ज संदर्भात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती. २१ हजार कोटींची ३ हजार किलो ड्रग्ज जप्त केले होते.