Tarun Bharat

हार्दिक पटेलचा काँग्रेसला रामराम

Advertisements

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेलने पक्षाचा राजीनामा दिला आहे. ट्विटद्वारे त्याने यासंदर्भात माहिती दिली. (Gujarat congress leader hardik patel resigns)

पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,, “आज मी काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे धाडस करतो. मला विश्वास आहे की, माझ्या या निर्णयाचे माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून आणि गुजरातच्या जनतेकडून स्वागत केले जाईल. मला विश्वास आहे की, माझ्या या वाटचालीनंतर भविष्यात गुजरातसाठी मी खऱ्या अर्थाने सकारात्मक काम करू शकेन. “

हार्दिक पटेलने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्ष देशहित आणि समाजहिताच्या पूर्णत: विरोधात काम करत असल्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे, असे त्याने पत्रात लिहिले आहे. ‘देशातील तरुणांना सक्षम आणि खंबीर नेतृत्व हवे आहे, पण काँग्रेस पक्ष निषेधाच्या राजकारणापुरताच मर्यादित राहिला आहे. तर, देशातील जनतेला विरोध करायचा नाही, त्यांना भविष्याचा विचार करणारा पर्याय हवा आहे. अयोध्येतील राम मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, काश्मीरमधील कलम 370 असो किंवा जीएसटी लागू करण्याचा निर्णय असो, या समस्या बऱ्याच काळापासून सोडवायच्या होत्या आणि काँग्रेस पक्षाने त्यात फक्त अडथळा म्हणून काम केले. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये कमी असल्याचा आरोपही पटेल याने केला आहे.

Related Stories

महाराष्ट्रात 5,753 नवे कोरोना रुग्ण; 50 मृत्यू

Rohan_P

उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

datta jadhav

पंतप्रधान मोदींनी आज बोलावली महत्त्वाची बैठक ; गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री राहणार उपस्थित

Abhijeet Shinde

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या दिशेने रवाना

Abhijeet Shinde

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : सकाळी ९ वाजेपर्यंत ६.९६ टक्के मतदान

Abhijeet Shinde

सराव शिबिरासाठी 24 जणांचा संघ जाहीर

Patil_p
error: Content is protected !!