Gujrat Eiection : आम आदमी पक्षाचे (AAP) बेपत्ता झालेले सुरत (पूर्व) चे उमेदवार कांचन जरीवाला (Kanchan Zariwala) यांनी अखेर आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. गेल्या काही दिवसापासून अचानक गायब झालेले जरीवाला यांचे भाजप (BJP) नेत्यांनी अपहरण केले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेल्या कांचन जरीवाला हे अचानक काही दिवस गायब झाले होते. आज अचानक ते सार्वजनिक ठिकाणी आले असले तरी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन अनपेक्षित धक्का दिला आहे.
आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा ( Raghav Chadhav ) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून “पोलिस आणि भाजपच्या गुंडांनी मिळून आमचे सुरत पूर्व उमेदवार कांचन जरीवाला यांना RO ऑफिसमध्ये ओढत आणून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले आहे.” असे चड्ढा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. “मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक’ हा शब्द एक विनोद बनला आहे!” असेही ते म्हणाले आहेत.

