Gujrat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या ( BJP) मंत्रीमंडळात मंत्री असणारे माजी मंत्री जय नारायण व्यास (Jay Naratyan Vyas) यांनी त्यांच्या मुलासह कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गुजरातच्या मंत्रीमंडळात माजी आरोग्य मंत्री असणारे जय नारायण व्यास यांच्यासह मुलगा समीर व्यास यांनीही अहमदाबादमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अहमदाबादमध्ये घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नारायण व्यास २००७ ते २०१२ या काळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री होते. त्यानंतर व्यास यांनी आपले वैयक्तिक कारण सांगून ५ नोव्हेंबर रोजी भाजप पक्षाचा त्याग केला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, “भाजप एकामागून एक सर्व नेत्यांना पक्षातून काढून टाकत असून यासाठी त्यांना लक्ष्य केले जात आहे,”

