Gujrat, Himachal Pradesh Election Results 2022 : गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सुरूवात झाली.त्यामुळे हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये कोण बाजी मारणार यााकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते.तर गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत भाजप आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. गुजरातमध्ये भाजपा १४२ जागांवर आघाडीवर असून ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. काँग्रेस २० तर आप सात जागांवर आघाडीवर आहे.
हिमाचल प्रदेशात भाजपनं विजयाचं खातं उघडलं
सुंदरनगरमधून भाजपचे उमेदवार राकेश कुमार विजयी
गुजरात
एकूण जागा- 182
भाजप-149
कॉंग्रेस-20
आप- 08
इतर-05
हिमाचल प्रदेश
एकूण जागा-68
भाजप-34
कॉंग्रेस-31
आप-
इतर-03
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.


next post