सावंतवाडी / प्रतिनिधी –
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या वतीने आयोजित केलेल्या कै.नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.या स्पर्धेत कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक ज्युनिअर काॅलेजमधील वेतोरेचा कु.विराज गणेश आरांवदेकर याने रोख रू३००० व सन्मानचिन्हासह प्रथम क्रमांक ,वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कला आणि वाणिज्य कनिष्ट महाविद्यालय तळेरेच्या कु स्नेहल संतोष तळेकर हीने रोख रू२००० व सन्मानचिन्हासह द्वितीय क्रमांक, श्रीमती नलिनी शांताराम कनिष्ठ महाविद्यालय, देवगडच्या कु.सुचिता लक्ष्मण मांजरेकर हीने रोख रू१००० व सन्मानचिन्हासह तृतीय क्रमांक प्राप्त केला.तर उत्तेजनार्थ क्रमांक राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीच्या कु.पलाशा राजन सामंत हीने रोख रू५०० व सन्मानचिन्ह तसेच राजमाता सत्वशिलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीच्या कु नेहा समीर ढोले हीने रोख रू५०० व सन्मानचिन्हासह प्राप्त केला.
तर सदर वक्तृत्व स्पर्धेचे सांघिक विजेतेपद व फिरती सांघिक ढाल कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक ज्युनिअर काॅलेज वेतोरेने प्राप्त केली. यावर्षी या वक्तृत्व स्पर्धेचे पहीलेच वर्ष असूनही सिंधुदुर्गातील नामंकित २२ महाविद्यालयातील ३५स्पर्धकांनी सहभाग दर्शवित स्पर्धायशस्वी केली.सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पत्रकार श्री.राजेश मोंडकर, व कवयित्री व लेखिका प्रा.श्रीम.हर्षवर्धिनी जाधव-सरदार यांनी काम पाहिले.