ऑनलाईन टीम/तरुण भारत
अॅड गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना आज गिरगाव कोर्टात (girgaon Court) हजर केले आहे. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर गिरगाव कोर्टाने (girgaon Court) गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर, सातारा, अकोला यासह अन्य पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गुणरत्न सतावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज कोर्टात झालेल्या युक्तिवादांनंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे कबूल केले आहे. तसेच त्यांनी ते पैसे फी म्हणून घेतल्याचेही त्यांनी कोर्टात सांगितले.
कोर्टात युक्तिवादावेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरात (pradeep garat)यांनी, एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली. याप्रकरणाच्या तपासाकरता पोलीस कोठडीची मागणीही वकिलांनी केली. कोर्टात युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी म्हटलं, सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. यामध्ये नोटा मोजण्याची मशीन कागदपत्रे, रजिस्टर सापडली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी हर्षद मेहता (harshad mehta) प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रिफरन्स म्हणुन वाचून दाखवला.
दरम्यान, सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तीवाद करत आपली बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने आज कोर्टात कुणीच वकील आलं नसल्याने त्यांनीच आपली बाजू मांडली. गुणरत्न सतावर्ते म्हणाले, पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायेत की हा एक मोठा स्कॅम आहे. मी 300 ते 500 रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजाकरता घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावे असाही सवाल सतावर्तेंनी उपस्थित केला.
यावेळी सदावर्ते यांनी जप्त केलेली कागदपत्र जप्त वकालत नामा आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला दुःखद आहे. माझे सासू सासरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. गाडी घेतली त्याची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्याकरता पैसे दिले ते ॲानलाईन दिल्याचे पुरावे आहेत. गाडी जुनी आहे, 2014 ची जुनी गाडी मी खरेदी केली आहे. नोटा मोजण्याची मशीन 3 हजाराला घेतलीय, आपण मुंबईत राहतो असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.