Tarun Bharat

ॲड. सदावर्ते यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Advertisements

ऑनलाईन टीम / सातारा :

राजघराण्यातील सदस्यांबद्दल अफजल्याची औलाद आणि राजघराण्याला मानत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदवर्ते यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी अर्थररोड जेलमधून ताब्यात घेतले होते. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाला विरोध, शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील हल्ला अशा कारणांनी कायम वादग्रस्त भूमिकेत राहिलेले सदावर्ते आर्थर रोड जेलमध्ये होते. त्यांनी सातारा-कोल्हापूर राजघराण्याबद्दल बोलताना या अफजल्याच्या औलादी आणि असल्या घराण्याला मी मानत नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी 9 ऑक्टोबर 2020 ला सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षात त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. सिल्वर ओकवरील हल्ल्यानंतर त्यांची जणू शंभरी भरली. गुरुवारी सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

आज सकाळी सदावर्ते यांना सातारा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सदावर्ते यांनी कोणाच्या सांगण्यावरून राजघराण्यावर अफझल खानाचे वशंज असल्याचा उल्लेख केला याचा तपास पोलिसांना करायचा असल्याचे सांगत सरकारी वकील अंजुम पठाण यांनी सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. तर सदावर्ते यांच्या वकिलांनी पोलिसांच्या नोटिशीच्या त्रुटी दाखवून त्यांना जामीन देण्याची मागणी केली होती. सदावर्ते यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीत तारीखच नाही. त्यांच्याकडून काहीच रिकव्हरी करायची नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्याचा युक्तिवाद सदावर्ते यांचे वकील सचिन थोरात यांनी केला होता. त्यांच्यासोबत सचिन थोरात, सतीश सूर्यवंशी, प्रदीप डोरे या वकिलांनीही सदावर्ते यांची बाजू मांडली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Related Stories

सातारा : करंजे एमआयडीसी प्रकरणी पालिकेचा कासवगतीने कागदी घोडे नाचवण्याचा कार्यक्रम

Abhijeet Shinde

गणपती मंदिर पुलावर वाहतुकीची कोंडी कायम : ट्रॅफिक पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Kalyani Amanagi

अफगाण मुद्यावर दिल्लीत NSA ची बैठक; पाकलाही निमंत्रण

datta jadhav

कर्नाटकला केंद्राकडून अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Abhijeet Shinde

कोरोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला WHO ची परवानगी

Abhijeet Shinde

सातारा : महिला तक्रारींचे होणार ऑनलाईन निराकरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!