Tarun Bharat

गुप्टिल मेलबर्न रेनेगेड्सशी करारबद्ध

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिन गुप्टिलने ऑस्ट्रेलियात होणाऱया बिगबॅश लीग टी-20 स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेसाठी गुप्टिलने मेलबर्न रेनेगेड्स क्लबबरोबर नुकताच करार केला आहे.

अलीकडेच क्रिकेट न्यूझीलंडने गुप्टिलला आपल्या मध्यवर्ती करारातून मुक्त केले होते. गेल्या ऑगस्टमध्ये मेलबर्न स्टार्स क्लबने न्यूझीलंडच्या टेंट बोल्टबरोबर या स्पर्धेसाठी करार केला होता. बिगबॅश लीग क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचे हे दोन क्रिकेटपटू खेळत असले तरी क्रिकेट न्यूझीलंडला सोडलेले नाही. मेलबर्न रेनेगेड्सने इंग्लंडच्या लिव्हिंगस्टोनच्या जागी गुप्टिलला करारबद्ध केले आहे. लिव्हिंगस्टोनचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश असल्याने तो बिगबॅश लीग स्पर्धेत खेळू शकणार नाही.

Related Stories

भारताने मागील पराभव विसरण्याची आवश्यकता

Patil_p

रेडियंट संघ उपांत्यफेरीत

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा लंकेविरुद्ध सनसनाटी विजय

Patil_p

विजय हजारे, जसू पटेल यांच्या कामगिरीचा सन्मान

Omkar B

इंग्लंडच्या विजयात वोक्स, रूटची चमक

Patil_p

प्रदुषणामुळे शरापोव्हाचा सामना वाया

Patil_p