मुख्याध्यापक दत्ताराम शेटकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /तिसवाडी
माणसाच्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. माता, पिता हे सुद्धा आपले गरुच असतात आणि विद्यालयांमध्ये आपल्याला शिकवतात तेही गुरु आपल्या कल्याणाचाच मार्ग आपल्याला दाखवत असतात. त्याशिवा संगीत, कला, क्रीडा किंवा अन्य क्षत्रातही आपले गुरु असतात. हे गुरुच आपल्याला योग्य दिशा दखवतात, म्हणून गुरुंच्या सल्ल्याचे पालन करावे, असे आवाहन ओल्ड गोवा एज्युकेशनल इस्टिटय़ूटचे मुख्याध्यापक दत्ताराम शेटकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
हायस्कूलच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शेटकर यांच्याच्या हस्ते समई प्रज्वलन व वेदव्यासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक वृंदावन सावंत, सुदेश तारी, सौ. स्मिता शेट, सौ. मारिया डायस तसेच कायक्रमाच्या संयोजक संगीत शिक्षिका प्राची माशेलकर उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. कुं. हंसिका भोमकर व अन्य विद्यार्थ्यांनी गुरुपुजन केले आणि त्यांना भेटवस्तू प्रदान केल्या. नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा’ हे गीत सादर केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करुन त्याद्वारे गुरुंचे महत्व विशद केले. कु. हमिशा घाडी, कु. अल्फिया शेख, कु. सुमन यांनी आपल्या भाषणांतून गुरुपौर्णिमेचे महत्व कथन केले. कु. उमरा अत्तर हिने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शिक्षिका प्राची माशेलकर यांनी आभार मानले.