प्रतिनिधी /बेळगाव
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ’स्वरमल्हार फाऊंडेशन ’बेळगावतर्फे रविवार दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता बेळगाव येथील गुरुवर्यांच्या प्रतिमांचे सामूहिक गुरूपूजन त्यांच्या शिष्य परिवारातर्फे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिष्यांच्या गायन, वादनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी गुरुराज कुलकर्णी (गायन), जगन्नाथ धर्माधिकारी (सतार), साईनाथ मोहिते (गायन), हृषिकेश हेर्लेकर (गायन), राहुल मंडोळकर (तबला), नेहा ताम्हणकर (संवादिनी) हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. सर्व कलाकारांना संतोष पुरी, विशाल मोडक, केतकी ताम्हणकर, सारंग कुलकर्णी साथ-संगत करणार
आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला
सदर कार्यक्रम श्री विठ्ठल देव मंदिर, शहापूर येथे होणार असून, सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.