Tarun Bharat

गुरूपौर्णिमा उत्सव कुडाळ माडय़ाच्यावाडीत उत्साहात साजरा

प्रतिनिधी /पणजी 

आपल्या जीवनात सदगुरूचे स्थान महत्वाचे आहे. सर्व मानव जातीला पारमार्थीक,अध्यात्मीक उन्नतीचा मार्ग दाखवीतो भक्तगणांना मोक्ष प्रत नेणारे सदगुरू असतात त्याच्याबद्दल प्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थातच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. ही गुरुपौर्णीमा माडय़ाच्यावाडीत उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री  श्री 108महंत प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. या पाद्यपूजेचा मान श्री. व सौ. आर. कवळेकर, पिळर्ण बार्देश गोवा यांना देण्यात आला पाद्यपूजा झाल्यावर श्री सदगुरू भक्त सेवा न्यास सामाजिक व धार्मिक संस्था तसेच गोव्यातील श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने सदगुरू गावडे काकांना पुष्पगुच्छ देण्यात आले. तसेच यावेळी  श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यास, बेती, बार्देश, गोवा या संस्थेच्यावतीने गरीब गरजु कुटुंबाला मदत म्हणून प्रमोद मांजरेकर यांना जीवनावश्यक वस्तू सद्गुरु गावडे काकांच्या शुभहस्ते देण्यात आल्या. यावेळी  सदगुरू गावडेकाका महाराजांनी आपल्या गुरु संदेशात मोलाचा उपदेश केला.

जीवनात पहिले गुरु आपले आई वडील, दुसरे गुरू शैक्षणिक क्षेत्रात मिळतात ते आपले शिक्षक आणि तिसरे गुरु ते सद्गुरु आपल्या जीवनाची वाटचाल कशी असावी. सत्य काय असत्य काय,  हे दाखवितात आपले जीवन सुखसमृद्धीकडे नेणारे असतात, असे सद्गुरु गावडे काकांनी सांगितले.

आपणाला जीवनामध्ये सुखी होण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता आहे ह्या तीन गोष्टी कशा मिळतात. ज्या शब्दातन आपणाला या तीन गोष्टी मिळतात त्या शब्दाला म्हणतात माऊली या माऊली या शब्दाचा अर्थ असा आहे.  मा म्हणजे मानवतावादी, मा म्हणजे दूसऱयाच्या जीवनात सुख शांती फुलविणारी, मा म्हणजे आपलसे करणारी, मा म्हणजे समाज परावर्तन करणारी, आपण दुसऱयाला प्रेम दिले तर दुसरा आपणाला प्रेम देणार. मा म्हणजे समाज परावर्तन करणारी, मा म्हणजे मांगल्याचे प्रतीक. जीवनात यश अपयश या दोन पायऱया आहेत. या यशाच्या अपयशाच्या पायऱयावर चालत असताना सत्य आणि नीती या दोन शब्दांचा अर्थ समजावून घेऊन धर्माचरण आचरण करावे मा या शब्दाचा अर्थ समजाऊन घेताना आपण माणसा माणसा मधली माणुसकी शोधायची आहे. हि सर्व भक्त गणानी आपल्यामध्ये बिंबवीली पाहिजे रूजवली पाहीजे.

आपल्यामध्ये लीनता, वात्सल्य भावना प्रेम भावना ही लीनतेची लक्षण घेऊन आपण जीवन जगले पाहिजे. माझ्या मध्ये लिनता निर्माण व्हायला पाहीजे देवाचा साक्षात्कार होण्यासाठी आपणाकडे लीनता असावी. जगातील सर्व श्रे÷ आहे तो परमात्मा. सदगुरू मार्ग या चांगल्या गोष्टी शिकवितो. कुलदेवतेची कृपा, आपल्या सद्गुरूच्या कृपेमुळेच आपण हा गुरुपौर्णीमा उत्सव साजरा करु शकलो. आपले जीवन दुसऱयासाठी चंदनासारखे झिझवा. दुसऱयाच्या जीवनात आनंद फुलवा हीच तुम्ही मला दिलेली गुरुदक्षिणा आहे, असे सद्गुरु गावडेकाका म्हणाले.

मान्यवरांचा सत्कार!

यावेळी सद्गुरु गावडेकाकांच्या हस्ते सौ. रक्षाली कवळेकर पिळर्ण बार्देश गोवा, दिलीप प्रभु तेडोंलकर फोंडा, मंगलदास गाड, म्हापसा, दिलीप म्हावळणकर, पर्वरी, नागेश शिरोडकर, शापोरा यांना गोव्यात होऊ घातलेल्या स्वामी समर्थ मंदिर निर्माणासाठी दिलेल्या उकृ÷ सहकार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर, प्रास्तविक भास्कर गावडे यांनी केले यावेळी विश्वस्त एकनाथ गावडे, सिद्धेश किनळेकर, पंकज कामत, सुजय गावडे, प्रिती कुशे, विजय साहील, भास्कर गावडे, बापू गावकर, राजन गावडे, बाबा गावडे, राकेश केसरकर, अमित कोरगावकर,  गिरीधर गावडे,  पद्मजा नाईक मिरजकर, अक्षय गाड उपस्थित होते..

Related Stories

मृतदेह गोमॅकोत नेण्यासाठी आमदार जेनिफरची अशीही धावपळ

Patil_p

डिचोली तालुक्मयाला जोरदार पावसाने झोडपले

Amit Kulkarni

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीवर शिक्कामोर्तब

Amit Kulkarni

दिवसभरात 52 दगावले, 2814 नवे बाधित

Amit Kulkarni

अट्टल चोरटय़ाला पणजी पोलिसांनी केली अटक

Patil_p

मुरगावच्या माजी उपनगराध्यक्षांसह कुटुंबातील चौघांचा मृत्यू,

Amit Kulkarni