वार्ताहर /पणजी
शांत स्वर ब्रह्म रंगीत संस्था, डिचोली गोवा व स्वरानन्या सांगीतिक प्रतिष्ठान, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने शेवटच्या श्रावणी शनिवारनिमित्त 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वा. श्री मारूतीराय संस्थान मारूतीगड पणजी येथे ‘गुरुपौर्णिमा उत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात सर्वश्री प्रज्ञा रावळ, राजलक्ष्मी गावस, अलिशा सीमेपुरूषकर, दत्तराज कोलवाळकर व स्नेहा नगरसेकर यांनी शास्त्राrय संगीत तसेच, भक्तिगीत, नाटय़गीत गाऊन श्रोत्यांना रिझवले. कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या संचालिका डॉ. गौरी नायक भट यांच्या गाण्याने झाला. सर्व कलाकारांना तबल्यावर मृणाल परब, हार्मोनियमवर दीपक पेंडसे व झांज आदित्य गांवकर यांनी साथसंगत केली.
देवस्थानाचे उपखजिनदार आशीष नागवेकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष सुधीर नाईक यांनी आभार मानले. देवस्थानाचे पुरोहित कृष्णमूर्ती यांनी डॉ. गौरी नायक भट यांना शाल, गुलाबपुष्प, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तद्नंतर रात्री 8.30 वा. महाआरती व तीर्थप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला.