सावंतवाडी/प्रतिनिधी-
श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडीच्या माध्यमातून ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे प्रथम व द्वितीय सत्रांमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सद्गुरू संगीत विद्यालयाचे गुरूवर्य निलेश मेस्त्री यांचे विद्यार्थी शास्त्रीय गायन – वादन सादर करणार आहेत. प्रथम सत्र स. ९.३० ते १.०० यावेळेत होणार असून दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन व नवोदित विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण होणार आहे. तर १.०० ते १.३० यावेळेत गुरू पूजन होणार आहे. दुसरे सत्र दु ४.०० ते ८.०० या दरम्यान विद्यालयाच्या नामांकित व यशस्वी विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण होणार असून विठ्ठल रखुमाई मंदीर,सावंतवाडी इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सद्गुरू संगीत विद्यालय शिष्य परिवार व पालक वर्ग यांनी केल आहे.