Tarun Bharat

Satara : किराणा मालाच्या दुकानातून तब्बल १ लाख ४५ हजार रुपयांचा गुटखा जप्त

अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई; एकाला अटक

वाई : किराणा मालाच्या दुकानातून तब्बल १ लाख ४५ हजार ६०० रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे. वाई गुन्हे प्रकटीकरण पथक व अन्न सुरक्षा विभागाने ही संयुक्त कारवाई करत महाराष्ट्र शासनाने राज्यात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्रीस बंदी केली. सातारा जिल्हयात बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.

शुक्रवारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अवैधरित्या गुटखा विकला जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरणे यांनी गुन्हे शाखेच्या मदतीने अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सापळा रचून गुटखा विक्री करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. दुकानाची झाडाझडती घेतलीअसता त्या ठिकाणी पथकाला १ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा गुटखा सापडला. यामध्ये विमल पान मसाला, वि १ तंबाखू, आरएमडी पानमसाला यांचा समावेश आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी वाई पोलीस ठाण्यात आरोपी यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय शिर्के करीत आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जान्हवे खराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर व रोहन शहा, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड यांनी कारवाई केलेली आहे.

Related Stories

मराठा पॅलेसमध्ये जुगार; अकराजणांवर गुन्हा दाखल

Patil_p

सातारा : केळेवाडीत माथेफिरूने लावली डोंगराला आग

datta jadhav

विसापूर येथे वयोवृध्द दाम्पत्याचा डबल मर्डर

Patil_p

गांजे गावातील पहिल्या महिला फौजीचे फुलांच्या वर्षावात जंगी स्वागत

datta jadhav

पिंपळवाडी येथे युवकाचा खून

datta jadhav

सातारा शहरात रात्री आठलाच शटर डाऊन

Patil_p