Tarun Bharat

बंडखोर आमदार तळ ठोकून असलेल्या ‘रेडिसन ब्लू’ने घेतला मोठा निर्णय

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे 41 आमदारांसोबत गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्लू’ या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या हॉटेलने आता मोठा निर्णय घेतला आहे. 30 जूनपर्यंत हॉटेलने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्व बुकींग आणि रेस्टॉरंटसारख्या सुविधाही बंद केल्या आहेत. या हॉटेलच्या वेबसाईटवरही आता 30 जूनपर्यंतची कोणतीही तारीख उपलब्ध नसल्याचं दाखवण्यात येत आहे.

या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आणि अपक्ष बंडखोर आमदारांसाठी 70 रुमचे बुकींग करण्यात आले आहे. सुरुवातीला या हॉटेलमध्ये 7 दिवसांसाठी बुकींग करण्यात आले होते. आता बुकींगचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलचे 7 दिवसांचे भाडे 56 लाख रुपये आहे. मुक्कामाचे दिवस वाढल्याने आता भाडेही वाढणार आहे. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एका दिवसाचे जेवण आणि इतर सुविधांसाठी तब्बल 8 लाख रुपये मोजावे लागतात.

दरम्यान, या हॉटेलशी करार असलेले फक्त एअरलाईन कंपन्यांचे कर्मचारीच जाऊ शकतात, कारण त्यांच्या खोल्या आधीच बुक केल्या गेल्या आहेत. इतर सर्वसामान्य ग्राहकांना या हॉटेल्सच्या खोल्या आणि रेस्टॉरंटही 30 जूनपर्यंत बंद असणार आहे.

Related Stories

पीएफआयचे ‘लक्ष्य’ नरेंद्र मोदी

Patil_p

राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा संशयित जेरबंद

Archana Banage

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट

Archana Banage

पंजाब : बाधितांनी ओलांडला 1.93 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

रुग्णांच्या रक्तनमुन्यात शिसे अन् निकेल धातू

Patil_p

आप ही आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी : चन्नी

Abhijeet Khandekar