प्रतिनिधी /फोंडा
फोंडा येथील जीव्हीएमच्या आदर्श उच्च माध्यामिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच होऊन संघाच्या अध्यक्षपदी येगेश मळकर्णे यांची निवड करण्यात आली.
निवडण्यात आलेली इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः उपाध्यक्ष-राजेश राणे, सचिव-नसरीन शेख, खजिनदार-सुबोध देसाई, सदस्य-डॉ. शिवलीला बदाची, अनुराधा श्रीवंत, गौतम साई व सागर खेडेकर. या बैठकीला गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष कृष्णा शेटय़े व प्राचार्य अवधूत कामत हे उपस्थित होते. कृष्णा शेटय़े यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याचे प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांना समुपदेश करण्यासाठी मार्गदर्शकाची नियुक्ती करण्यात आल्याची त्यांनी यावेळी सांगितले. प्राचार्य अवधूत कामत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगताना स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आकाश बायजूस्च्या साहाय्याने मार्गदर्शन देण्यात येत आहे. पालकांच्या शंकाचे यावेळी त्यानी निरसन केले. नसरीन शेख यांनी आभार मानले.