Tarun Bharat

ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेला विज्ञान स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे स्मार्ट वैज्ञानिक या विज्ञान विषयावर आधारित आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगाव परिसरातील 21 शाळांच्या 156 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस असे वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. या कार्यक्रमाला सर्वो कंट्रोल कंपनीचे प्रमुख दीपक धडोती उपस्थित होते. ज्ञान प्रबोधन मंदिरने या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सेपेटरी पुष्पांजली मुक्कण्णावर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. इक्हेंट चेअरमन डॉ. रचना शानभाग व प्रीती भंडारे यांनी प्रकल्पांचे नियोजन केले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत ज्ञान प्रबोधन शाळेने प्रथम क्रमांक, पिरनवाडी येथील केएलएस पब्लिक स्कूलने द्वितीय तर कॅम्प येथील सेंट जोसेफ स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.

गट 1 (इयत्ता पहिली व दुसरी)- प्रथम भरतेश हायस्कूल हलगा, द्वितीय ज्ञान प्रबोधन मंदिर, तृतीय डिव्हाईन प्रॉव्हिडन्स, उत्तेजनार्थ भाषिणी स्कूल व लव्हडेल स्कूल. गट 2- (इयत्ता तिसरी व चौथी)- प्रथम एम. व्ही. एम. इंग्लीश मीडियम स्कूल, द्वितीय सेंट जोसेफ, तृतीय भाषिणी स्कूल, उत्तेजनार्थ ज्ञान प्रबोधन व डिव्हाईन प्रॉव्हिडन्स, गट 3- (इयत्ता पाचवी व सहावी)- प्रथम ज्ञान प्रबोधन मंदिर, द्वितीय डिव्हाईन प्रॉव्हिडन्स, तृतीय संजय घोडावत स्कूल, उत्तेजनार्थ गोमटेश हायस्कूल व भरतेश हायस्कूल. गट 4- (इयत्ता सातवी व आठवी)- प्रथम लव्हडेल स्कूल, द्वितीय ज्ञान प्रबोधन मंदिर, तृतीय डिव्हाईन प्रॉव्हिडन्स, उत्तेजनार्थ भरतेश सेंट्रल स्कूल व सेंट जोसेफ. गट 5- (इयत्ता नववी व दहावी)- प्रथम सेंट पॉल्स हायस्कूल, द्वितीय केएलएस पब्लिक स्कूल, तृतीय गोमटेश हायस्कूल, उत्तेजनार्थ केएलएस हिंदवाडी व संजय घोडावत स्कूल.

Related Stories

शाळा पूर्णवेळ भरलो अन् मुले आनंदली!

Amit Kulkarni

नाशिक विमानसेवा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द

Amit Kulkarni

पोलीस अधिकाऱयांची तत्परता, वेळेत पोहोचला रक्तदाता

Omkar B

बेळगाव जिह्यात बुधवारी 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

अनगोळ येथील माय-लेक बेपत्ता

Amit Kulkarni

धारवाड रोड उड्डाणपुलाखालील रस्त्याची वाताहत

Patil_p
error: Content is protected !!