क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठा युवक संघ व आबा हिंद स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 17 व्या आंतरशालेय आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत 45 गुणांसह ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात सेंट झेवियर्सने 42 गुणांसह तर मुलींच्या गटात सेंट जोसेफने विजेतेपद पटकाविले.
रोटरी मनपा जलतरण तलावात 17 व्या शालेय आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत 300 हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत महाविद्यालयीन गटात जीएसएसच्या वरून धामणकर याने 13 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. गट 1 – नववी ते दहावी मध्ये स्वरूप धनुचे रॉयल पब्लिक स्कूल 15 गुणांसह, गट 2 – सातवी ते आठवी या गटात अमन सुनगार सेंटपॉल्स यांनी 15 गुणंसह, गट 3 – पाचवी ते सहावी गटात युवराज पावशे सेंटपॉल्स 13 गुणांसह, तीसरी व चौथी गटात अथर्व राजगोळकर एमव्हीएम 13 गुणांसह, पहिली ते दुसरी गटात झिशांत भाटीने संजय घोडावत याने 10 गुणांसह तर ज्युनियर केजी व सीनियर केजी गटात आद्वीक कुरळे 10 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
45 गुणांसह ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेने सर्वसाधारण विजेतेपद, मुलांच्या गटात 42 गुणांसह सेंट झेवियर्सने सर्वसाधारण विजेतेपद, 32 गुणांसह सेंट पॉल्सने उपविजेतेपद, 39 गुणांसह मुलींच्या गटात सेंट जोसेफने उपविजेतेपद पटकाविले.
मुलींच्या विभागात महाविद्यालय गटात नितीका कारापुरकर गोवा यांनी 15 गुणांसह, गट 1 मध्ये अनन्या पै केएलई इंटरनॅशनल 11 गुणांसह, गट 2 मध्ये वेदा खानोलकर जीजी चिटणीस 15 गुणांसह, गट 3-निधी कुलकर्णी केएलएस पब्लिक 15 गुणांसह, गट 4-अहिका हलगेकर सेंट जोसेफ व निधी सामंत कोल्हापूर 13 गुणांसह गट 5-पारवी हलगेकर सेंट जोसेफ 15 गुणांसह, गट 6 मध्ये भक्ती भागवत हुबळीने 8 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे बाळासाहेब काकतकर, मारूती देवगेकर, मोहन सप्रे, शिवाजी हंगीरगेकर, श्रीकांत देसाई, नारायण किटवाडकर, शिवाजी हंडे, सुहास किल्लेकर, शेखर हंडे, डॉ. शिवप्रसाद दंडगी, शिवकुमार हिरेमठ, बाळकृष्ण गोडसे, विना जोशी, विलास घाडी, एम. पी. मरणूर, मोहन सप्रे, यल्लाप्पा बागेवाडी, व मुकुंद महागावकर यांच्या हस्ते पदके, रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात
आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शितल हुलबत्ते, अमित जाधव, संदीप मोहिते, मारूती घाडी, प्रसाद हुली, शिवराज मोहिते, रणजित पाटील, चंद्रकांत बेळगोजी, ऍड. संतोष गडकरी, डॉ. सुधीर जोशी, अमर होनगेकर, ऋषिकेश जाधव, वैभव शानभाग, संजय मरगाळे, प्रवीण भोसे, भरत पाटील, विनय वेर्णेकर, ज्योती पवार, शुभांगी मंगळोरकर, विजया शिरसाट, शितल जाधव, नंदा पाटील, प्रसन्ना बसुर्तेकर, श्रीदेवी शेट्टी, परमनाथ मेलगे यांनी विशेष परिश्रम घेतले.