Tarun Bharat

एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजचा जिमखाना डे

प्रतिनिधी / बेळगाव

एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजचा जिमखाना डे मराठा मंदिर येथे नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आप्पासाहेब गुरव व अध्यक्ष म्हणून एसकेई सोसायटी गर्व्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आनंद सराफ उपस्थित होते.

प्रारंभी प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. प्रा. अरविंद हलगेकर यांनी अहवाल सादर केला. पाहुण्यांची ओळख डॉ. आशा कुलकर्णी यांनी करुन दिली. यावेळी आप्पासाहेब गुरव यांनी विद्यार्थी जीवनात कसे रहायला हवे, हे सांगून समाजाला तरुणाईकडून भरपूर अपेक्षा असून त्या पूर्ण करुन समाजाचे ऋण फेडावे, असे सांगितले. आनंद सराफ यांनी विविध क्षेत्रात पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी गुणी विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. उकृष्ट विद्यार्थी म्हणून अंजली गावडे हिला चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थी सचिव रोहन शेलार यांनी आभार मानले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्रशांत मनकाळे, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी पाटील तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली.

Related Stories

माणूसपणासाठी कवी-लेखकांनी काम करावे!

Amit Kulkarni

ग्रामीण भागात धुक्यांच्या प्रमाणात वाढ

Patil_p

बिम्सला उद्योजकांकडून भरघोस अर्थसाहाय्य

Amit Kulkarni

बुडाला आम्ही कदापीही जमीन देणार नाही

Patil_p

सुळगे-येळ्ळूर ऍप्रोच रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ

Omkar B

वनवेमधून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करा

Omkar B